पकौड़ा लोन लेकर थपौड़ा मार मोदी विदेश भागम

छोट्या मोदीला पळवण्यासाठी मोठ्या मोदीने सगळ्या सुरक्षा एजेन्सी माझ्या मागे लावल्या - लालू प्रसाद यादव

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण देशाला हादरवून सोडणारा बँक घोटाळा म्हणजे नीरव मोदीचा पंजाब नॅशनल बँक घोटाळा. याच घोटाळ्यावरून विरोधीपक्षांनी सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली आहे. आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यांनी ट्विटकरत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे. लालू प्रसाद हे चारा घोटाळ्याप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. मात्र त्याचं ट्विट हंड्ल सध्या सुरु आहे.

लालू प्रसाद ट्विटमध्ये म्हणतात ‘घराचा चौकीदार लुटारूंच्या मदतीने आपल्याच घरी चोरी करत असेल तर त्याला बदलले पाहिजे की नाही ? सांगा त्याला बदलायला हवे की नाही ?’

दरम्यान पीएनबी घोटाळा आणि मध्यंतरी गाजलेल्या पकोडा विकण्याच्या सल्ल्यावर देखील लालू प्रसाद यांनी टीका केली होती.

चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव हे सध्या रांचीतील तुरुंगात आहेत. मात्र जेलमध्ये जाण्यापूर्वी आपले ट्विटर स्वकीयांकडून चालवेल जाणार असल्याचे सांगितले होते. तसेच आपला मेसेज जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी याचा वापर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...