लालू प्रसाद यादव ९ तारखेला बाहेर येतील आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी नितीशकुमार घरी जातील

पटना:बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिवसेंदिवस रंग भरत चाललाय.लालू प्रसाद यादव यांच्या अनुपस्थितीत तेजस्वी यादव स्वतःचा अगदी मजबूत पद्धतीने खिंड लढवत आहेत.याचीच प्रतीती आज आली.राष्ट्रीय जनता दलाच्या एका उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या एका रोड-शोला संबोधित करतांना तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांवर आपली तोफ डागली.

तेजस्वी म्हणाले की ‘बरेच लोकं मला विचारत आहेत की लालू प्रसादांची अनुपस्थिती तुम्हाला व्यथित करतेय का ? त्यावर मी त्यांना उत्तर देऊ इच्छितो की येत्या ९ तारखेला लाऊ बाहेर येतील आणि १० तारखेला नितीश कुमारांची सुट्टी करतील.त्यामुळे आमची चिंता तुम्ही अजिबात करू नका.
लालु प्रसाद यादव सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सध्या झारखंड मध्ये कैद आहेत.त्यांच्या त्या प्रकरणावर सध्या न्यायिक सुनावणी चालू आहे.पण लवकरच लालू प्रसाद बाहेर येतील अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.

सोबतच तेजस्वी असेही म्हणाले की ‘ नितीशजी आता आपण म्हातारे झाला आहात त्यामुळे एका तरुणाच्या हातात सत्ता द्या आणि चालते व्हा.तेजस्वी हे ३१ वर्षाचे आहेत तर नितीश कुमार यांचं वय ६९ वर्षे आहे.त्यामुळे या राज्याची सूत्रे एका तरुणाच्या हातात पाहिजे अशी अनेक बिहारी तरुणाची देखील इच्छा आहे.

महत्वाच्या बातम्या-