एकेकाळी रेल्वे मंत्रालय सांभाळणारे लालू आता जेलमध्ये करणार माळी काम

टीम महाराष्ट्र देशा: माजी रेल्वेमंत्री तसेच बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यानंतर आता त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली. त्यांना एकूण साडेतीन वर्ष कारावास तर ५ लाख दंड सुनावण्यात आला आहे.

जेलमध्ये रवानगी करण्यात आल्यानंतर आता लालूंना माळी काम करावं लागणार आहे,तर दिवसाला ९३ रुपये वेतन त्यांना दिल जाणार आहे. दरम्यान रांची कोर्टाच्या निर्णयाविरूद्ध आता लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव आता हाय कोर्टात दाद मागणार आहे.

चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यावर एकूण पाच केस सुरू होत्या. देवगड जिल्ह्यात १९९१ ते ९४ या काळात देशाच्या तिजोरीतून चुकीच्या प्रकारे ८९.२७ लाख रुपये काढून गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी एकूण ३८ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी केसचा तपास आणि सुनावणीच्या काळात ११ जणांचा मृत्यू झाला होता आणि २००६-०७ मध्ये दोन जणांना दोषी ठरविण्यात आले होते.

काय आहे चार घोटाळा प्रकरण ?
न्यायालयाने ९५० कोटी रूपयांच्या चारा घोटाळ्याशी निगडीत देवघर कोषागारमधून ८९ लाख २७ हजार रूपये अवैधरित्या काढल्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवले होते. याप्रकरणी एकूण ३८ जणांना आरोपी ठरवण्यात आले होते. यातील ११ जणांचा मृत्यू झाला आणि तिघे सीबीआय चे साक्षीदार झाले होते. तर दोघांनी आपला गुन्हा कबूल केला होता. त्यामुळे त्यांना २००६-०७ मध्येच शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर २२ आरोपी राहिले होते. चारा घोटाळा प्रकरण पहिल्यांदा १९९६ साली समोर आला होत. बिहारच्या पशुपालन विभागात करोडो रुपयांचा घोटाळा समोर आला होता. १०९० ते १९९७ दरम्यान लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन खात्याने बिहारच्या विविध जिल्ह्यात कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याचं आरोप होता. चारा घोटाळ्यात ३ वेगवेगळी प्रकरण असून तिन्हीही प्रकरणात लालू प्रसाद यादव आरोपी होते.

You might also like
Comments
Loading...