fbpx

लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर

नवी दिल्ली – बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना आयआरसीटीसी कंत्राट घोटाळा प्रकरणी नियमीत जामीन मंजूर झाला आहे. यामध्ये त्यांच्या पत्नीसह मुलालाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. ११ फेब्रुवारीला या प्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे.

याआधी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने राखून ठेवली होती.

राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पटियाला हाऊस न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती.

यावर १९ जानेवारीला यावर सुनावणी झाली होती. न्यायालयाने त्यावेळी निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आज सुनावणीमध्ये त्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांची निश्चित रक्कम भरावी लागणार आहे.