लालूप्रसाद यादव यानां साडेतीन वर्षाची शिक्षा तर ५ लाखांचा दंड

lalu-prasad-

रांची: बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज शिक्षा सुनावली आहे. लालूप्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांची शिक्षा तसेच ५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिला आहे. सीबीआय कोर्टाने आरजेडीचे सुप्रीमो लालू प्रसाद यादवांसह १६ आरोपींना २३ डिसेंबर २०१७ रोजी देवघर कोषागारात भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवले होते.
चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यावर एकूण पाच केस सुरू होत्या. देवगड जिल्ह्यात १९९१ ते ९४ या काळात देशाच्या तिजोरीतून चुकीच्या प्रकारे ८९.२७ लाख रुपये काढून गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी एकूण ३८ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी केसचा तपास आणि सुनावणीच्या काळात ११ जणांचा मृत्यू झाला होता आणि २००६-०७ मध्ये दोन जणांना दोषी ठरविण्यात आले होते.

काय आहे चार घोटाळा प्रकरण ?

न्यायालयाने ९५० कोटी रूपयांच्या चारा घोटाळ्याशी निगडीत देवघर कोषागारमधून ८९ लाख २७ हजार रूपये अवैधरित्या काढल्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवले होते. याप्रकरणी एकूण ३८ जणांना आरोपी ठरवण्यात आले होते. यातील ११ जणांचा मृत्यू झाला आणि तिघे सीबीआय चे साक्षीदार झाले होते. तर दोघांनी आपला गुन्हा कबूल केला होता. त्यामुळे त्यांना २००६-०७ मध्येच शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर २२ आरोपी राहिले होते. चारा घोटाळा प्रकरण पहिल्यांदा १९९६ साली समोर आला होत. बिहारच्या पशुपालन विभागात करोडो रुपयांचा घोटाळा समोर आला होता. १०९० ते १९९७ दरम्यान लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन खात्याने बिहारच्या विविध जिल्ह्यात कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याचं आरोप होता. चारा घोटाळ्यात ३ वेगवेगळी प्रकरण असून तिन्हीही प्रकरणात लालू प्रसाद यादव आरोपी होते.

Loading...