लालूंचा पाय खोलात; चारा घोटाळ्याच्या तिसऱ्या प्रकरणी आणखी ५ वर्षांची शिक्षा

लालूंना आजच शिक्षा होण्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा- चारा घोटाळ्यातील तिसऱ्या प्रकरणात राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवलं असून ५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. चारा घोटाळ्यातील तिसरं प्रकरण होतं. यापूर्वीच्या दोन प्रकरणांमध्ये लालू यांना शिक्षा झाली आहे. या प्रकरणाची सुनावणी १० जानेवारी रोजी पूर्ण झाली होती आणि न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. बुधवारी झालेल्या प्रकरणाच्या सुनावणीत लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.

याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. चाईबासा घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने ५६ आरोपींपैकी ५० जणांना दोषी तर सहा जणांना निर्दोष ठरवण्यात आले. ९५० कोटींच्या चारा घोटाळ्याशी निगडीत चाईबासा कोषागारमधून ३५ कोटी ६२ लाख रूपये काढण्यात आले होते. चाईबासा कोषागारप्रकरणी १२ डिसेंबर २००१ मध्ये ७६ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

1992-93 मध्ये चैबसातील खजिन्यातून सुमारे 33 कोटी 67 लाख रूपये काढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणाची सुनावणी न्या. प्रसाद यांच्यासमोर होणार होती. तसेच बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची पशूखाद्य गैरव्यवहाराच्या दुसऱ्या प्रकरणात न्यायालयाने डिसेंबरमध्ये त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, त्यांची तिसऱ्या प्रकरणात चैबसा खजिन्यातून निधीचा घोटाळा केल्याचा आरोपावरून न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले आहे. मात्र, मिश्रा यांना अद्याप शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने 56 पैकी 50 आरोपींना दोषी ठरवले.

You might also like
Comments
Loading...