रांची: लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणातही न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले. सहापैकी चार खटल्यात लालूंवरील दोष सिद्ध झाले आहेत. या प्रकरणातील दुसरे आरोपी माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांना निर्दोष सोडले आहे. या दोघांसह चार घोटाळ्यात ३१ आरोपी होते. लालू यादव यांच्यावर चारा घोटाळ्याचे वेगवेगळे ६ खटले सुरु आहे त्यातील हे चौथे प्रकरण होते.
लालूप्रसाद यादव यांच्यावर चारा घोटाळ्याचे एकूण सहा खटले आहेत, ज्यापैकी तीन प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर आज दुमका कोषागार या चौथ्या प्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले. लालूप्रसाद यांच्यावर डिसेंबर १९९५ ते जानेवारी १९९६ दरम्यान दुमका कोषागारमधून १३.१३ कोटी रुपये बोगस पद्धतीने काढल्याचा आरोप आहे. न्यायालयाने १९ जणांना दोषी ठरवलं असून, १२ जणांची सुटका केली आहे. लालूंच्या शिक्षेवर २१,२२ आणि २३ मार्चला सुनावणी होणार आहे. आरजेडी नेते रघुवंश प्रसाद सिंह म्हणाले, हा सर्व नरेंद्र मोदी आणि नितीश कुमारांचा खेळ आहे. पुन्हा एकदा लालू यादवांना जेलमध्ये जावे लागले आणि जगन्नाथ मिश्रा यांची सुटका झाली आहे.
Lalu Prasad Yadav leaves CBI court in Ranchi after being pronounced guilty in Fodder scam (Dumka Treasury) case pic.twitter.com/PbmdprcFR6
— ANI (@ANI) March 19, 2018