fbpx

लालूंची शरणागती;११० दिवसानंतर पुन्हा तुरुंगात रवानगी

LaluYadav

रांची : राष्ट्रीय जनता दल पक्षाचे अध्यक्ष व चारा घोटाळ्यातील दोषी लालूप्रसाद यादव यांनी आज (ता. 30) रांची येथील उच्च न्यायालयात शरणांगती पत्करली. लालू हे चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी सिद्ध झाल्यानंतर वैद्यकीय कारणांमुळे पॅरोलवर बाहेर होते.

लालू प्रसाद यादव यांनी याआधी झारखंड उच्च न्यायालयाकडे जामिनाचा कालावधी वाढवण्यासाठी याचिका केली होती. मात्र त्यांची ही याचिका न्यायालयानं फेटाळली. यानंतर त्यांना 30 ऑगस्टपर्यंत न्यायालयापर्यंत आत्मसमर्पण करण्याची सूचना करण्यात आली होती. यानंतर लालू प्रसाद यादव आज न्यायालयाला शरण आले.