ऐन दिवाळीत लालपरी संपावर, २५ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

blank

टीम महाराष्ट्र देशा : ऐन दिवाळीच्या तोंडावर लालपरी संपावर जाणार आहे. दिवाळीतील मिळणारा सानुग्रह अनुदान व विविध समस्यांबाबत राज्य परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांनी  शुक्रवारी दिनांक २५ तारखेला संप पुकारला आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावरचं एसटी कर्मचारी संपावर जाणार असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

सोलापूर विभागातील कर्मचारी संघटनेचे सचिव प्रशांत गायकवाड यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, दिवाळी सण तोंडावर असताना एसटी महामंडळ प्रशासन लाखो कर्मचार्यांचे आर्थिक नुकसान करत आहे. कर्मचाऱ्यांसमोर दिवाळी सण साजरा कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.याबाबत वेळोवेळी आंदोलने, निवेदन देऊनही एसटी प्रशासन जागे होत नाही. यासाठी एसटी महामंडळातील कर्मचार्यांनी २५ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे.

तसेच एसटी प्रशासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे व तोडगा काढायला हवा, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. दिवाळीत मिळणारा सानुग्राह अद्याप मिळाला नाही. दिवाळीतर दोनच दिवासावर आली आहे. याबाबत एसटी महामंडळाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही याची दखल घेतली जात नाही, यामुळे २५ ऑक्टोबर रोजी आंदोलन करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या