‘जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज हयात असते, तर कदाचित ते भाजपात असते’

लखनऊ – जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज हयात असते, तर कदाचित ते भाजपामध्ये आले असते, असे भाष्य उत्तर प्रदेशातील अनुसूचित जाती आणि जमाती वित्त/विकास विभागाचे अध्यक्ष डॉ. लालजी निर्मल यांनी बाबासाहेबांवर केले आहे. दलितांसाठी केंद्र आणि भाजपा सरकारनं केलेल्या कामाचा हवाला देताना त्यांनी हे विधान केले आहे.

डॉ. निर्मल यांनी काल पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस, सपा आणि बसपा हे जातीयवादी पक्ष आहेत. त्यामुळेच ते जातीचं राजकारण करतात असे स्पष्ट केले. यापुढे त्यांनी बसपाच्या अध्यक्षा मायावतींवर टीकेची झोड उठवली आहे. मायावती यांनी बाबासाहेबांच्या संविधानाचा भंग करणं आणि त्याला कमकुवत करण्याचं काम जर कोणी केले आहे. असा ही आरोप त्यांनी केला आहे.

यावेळी केंद्र सरकारनं आर्थिक वर्षात दलित समाजाच्या विकास योजनांसाठी जवळपास 138 कोटी रुपये दिले आहेत. तर, उत्तर प्रदेशमधील अनुसूचित जाती आणि जमाती वित्त/विकास विभागाने 12, 280 कुटुंबांना 14.27 कोटी रुपयांची मदत केल्याचेही त्यांनी अधोरेखित केलं आहे.

‘…तर डॉ. आंबेडकरांनादेखील देशद्रोही ठरवलं असते’