भाजपचा अंतर्गत कलह मिटवण्यासाठी ‘भीष्माचार्य’ मैदानात

नागपूर : ज्या सोशल मिडियाच्या जीवावर भाजप सरकार सत्तेत आले आता तेच शस्र भाजप वर उलटल्याच चित्र पहायला मिळत आहे. त्याचबरोबर यशवंत सिन्हा यांच्यासह भाजपचे अन्य जुनेजाणते नेते मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर नाराज असून भाजपवर उघड तोंडसुख घेत आहेत. अशात आता या सगळ्या आघातांवर वार करण्यासाठी आणि भाजपच्या अंतर्गत ‘डॅमेज कंट्रोल’ साठी भाजप ने आपले एकेकाळचे ब्रम्हास्र अर्थात देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची मदत घेण्याचे प्रयत्न सुरु आहे आहेत.

Loading...

भाजपमधील नाराजांची समजूत काढण्यासाठी पुढच्या काळात अडवाणींच्या माध्यमातून प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने आडवाणी यांनी नागपूर मधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्याला हजेरी लावल्याच बोलल जात आहे.

तब्बल १२ वर्षांनंतर अडवाणी यांनी संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे अनेक ज्येष्ठ स्वयंसेवकांतून बोलल जातंय. गेल्या काही वर्षांपासून संघ आणि अडवाणी यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. पाकिस्तानात जाऊन मोहम्मद अली जिना यांचा उदो केल्याने संघ त्यांच्यावर नाराज होता. पण आताच्या भेटीतून ही नाराजीही दूर झाल्याचे बोललं जात आहे.
दसऱ्याच्या एक दिवस आधीच अडवाणी नागपुरात आले. एका उद्योजकाच्या घरी मुक्काम केला आणि त्यानंतर शनिवारी सकाळी साडेसात वाजता ते रेशीमबाग मैदानावरील संघाच्या कार्यक्रमाला हजर झाले.

दरम्यान, मोदी सरकारच्या लोकप्रियतेचा आलेख ढासाळता असून संघाने केलेल्या एका सर्वेक्षणात २०१९ मध्ये भाजपला याचा फटका बसणार असल्याचे दिसून आले आहे. भाजपात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांना मानणारा मोठा वर्ग मोदी-शहांच्या कार्यप्रणालीमुळे नाराज आहे. अडवाणी यांच्या माध्यमातून नाराज गटाला समजावण्यासाठी ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न केला जाईल. अडवाणींची संघ भेट याचाच एक भाग होता, अशी माहिती आहे.Loading…


Loading…

Loading...