सातारा जिल्ह्यातील तिन्ही राजांना घरी पाठविण्याची वेळ आली आहे : लक्ष्मण माने

'विचार करून बोला',लक्ष्मण मानेंचा उदयनराजे भोसले यांना इशारा

सातारा : ‘स्वराज्यामध्ये किल्ल्यांची निर्मिती करताना भिडेंच्या नव्हे तर बहुजन लोकांनी कष्ट उपसले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज म्हणवणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांनी मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत बोलताना आधी पूर्ण विचार करावा. वंचित घटकांबद्दल बोलताना ते नेहमीच जीभ सैल सोडतात, आता जिल्ह्यातील तिन्ही राजांना घरी पाठविण्याची वेळ आली आहे,’ अशी टीका बोचरी वंचित बहुजन महाआघाडीचे प्रवक्ते पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केली.  साताऱ्यातील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत माने बोलत होते.

नेमकं काय म्हणाले माने ?
‘साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत नेहमीच वादग्रस्त विधान करीत असतात. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत असताना त्यांनी पुन्हा आपली जीभ सैल सोडली, याचा वंचित आघाडीतर्फे निषेध करण्यात येत आहे. उदयनराजे हे परंपरेने राजे झाले आहेत. साताऱ्यातील व महाराष्ट्रातील जनता तुम्हाला केवळ छत्रपतींच्या घराण्यात जन्माला आला म्हणून मान देते. त्यामुळे तुमचे राजेपण टिकून आहे. बोलताना डोकं थंड ठेवा आणि विचार करून बोला.

स्वराज्यामध्ये किल्ल्यांची निर्मिती करताना भिडेंच्या नव्हे तर बहुजन लोकांनी कष्ट उपसले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज म्हणवणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांनी मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत बोलताना आधी पूर्ण विचार करावा. वंचित घटकांबद्दल बोलताना ते नेहमीच जीभ सैल सोडतात, आता जिल्ह्यातील तिन्ही राजांना घरी पाठविण्याची वेळ आली आहे.राजे-महाराजांना आता घरी बसविण्यासाठी त्यांच्याविरोधात उमेदवार देणार ‘.

You might also like
Comments
Loading...