प्लास्टिक बंदी करणाऱ्या मनपा ला २५ लाख तर नगर परिषदेस १५ लाख आणि ग्रामपंचायतीस १० लाख

शंभर टक्के प्लास्टिक बंदी करणाऱ्या मनपाला २५ लाख, नपाला १५ लाख, ग्रा.पं. ला १० लाख रु. पारितोषिक देण्याची घोषणा

मुंबई  : शंभर टक्के प्लास्टिक बंदी करणाऱ्या राज्यातील महानगर पालिकेस २५ लाख, नगर परिषदेस १५ लाख तर सहा महसूल विभागातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीस १० लाख रुपयांचे पारितोषिक पर्यावरण दिनी देण्यात येईल, अशी घोषणा यावेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली.

राज्यमंत्री श्री. पोटे-पाटील म्हणाले, पर्यावरण विभागाने मिशन प्लास्टिक बंदी हे काम हाती घेऊन ते यशस्वी करुन दाखविले आहे. प्लास्टिक मुळे नदी नाल्यांना येणारा महापूर, प्लास्टिक वस्तूंच्या वापरामुळे होणारे गंभीर आजार, तापमानात झालेली वाढ यामुळे जगभर चिंता वाढू लागली आहे. प्रत्येक व्यक्तीने किमान शंभर लोकांना प्लास्टिक बंदी निर्णयाची माहिती दिल्यास आपले राज्य शंभर टक्के प्लास्टिक मुक्त होईल.

श्री. गवई म्हणाले, प्लास्टिक बंदीची माहिती गावागावात पोहोचली आहे. या मोहिमेला एका चळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. आपल्या राज्यात मिळणारा प्रतिसाद पाहता तामिळनाडू राज्यानेही आपल्याकडील कायद्याची माहिती घेऊन १ जानेवारी २०१९ पासून तेथेही प्लास्टिक बंदीचा निर्णय जाहीर केला आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक वस्तू वापरण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.