‘लाजवाब..’सौंदर्याने उर्मिला कोठारेने केले घायाळ

‘लाजवाब..’सौंदर्याने उर्मिला कोठारेने केले घायाळ

urmila

मुंबई : मराठीत चित्रपटसृष्टीतील उर्मिला कोठारेला बालपणापासूनच डान्सची आवड असल्याने मोठी झाल्यावरही तिने डान्ससोबत अभिनयाचे करिअर निवडले. तिने चित्रपटातील अभिनयासह आपल्या आवडीला देखील तितकेच महत्व दिल्याने आज ती उत्तम डान्सर म्हणून देखील परिचित आहे.

अलिकडेच उर्मिलाने ती तिचे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अवघ्या काही कालावधीतच तिच्या या डान्स व्हिडिओला प्रसिद्धी देखील मिळत आहे. ती तिच्या मुलीला देखील डान्स शिकवताना दिसते. नुकतेच उर्मिलाचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोत तिने जांभळ्या रंगाचा टॉप आणि हिरव्या रंगाचा स्कर्ट घातला असून, त्यावर तिने राखाडी रंगाचे जॅकेट घातले आहे. तसेच गळ्यात एक सुंदर नेकलेस आणि यासोबत केसांची पोनीटेल घातली आहे. या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. या वेस्टर्न लूकमध्ये तिचे सौंदर्य अप्रतिम दिसत आहे.

लाजवाब सुंदर दिसत आहेस तू, सो क्यूट, झकास.., अशी कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे. तिच्या या ड्रेसचे कौतुक करत असून याच ड्रेसमधील तिने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. तिच्या व्हिडिओला देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. उर्मिला कोठारेने ‘दुनियादारी’, ‘शुभमंगल सावधान’, ‘ती सध्या काय करते’, ‘गुरू’, ‘काकन’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘मायका’ आणि ‘मेरा ससुराल’ या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या