महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अपघातातून सुखरूप बचावले

टीम महाराष्ट्र देशा : चेंबूर ट्राँम्बे येथील एस्सार स्टुडियोला आग लागली.या स्टुडियोमध्ये मराठी वाहिनीवर चालणाऱ्या ‘झिंग झिंग झिंगाट’ या कार्यक्रमाचा सेट आहे. कार्यक्रमाच्या शुटींगदरम्यान सेटवर आग लागली.त्यावेळी आदेश बांदेकर आणि सर्व स्पर्धक मुख्य स्टेजवरच उपस्थित होते. मात्र या अपघातात कुणालाही इजा झाली नसल्याची माहिती मिळत आहे.आग लागल्याचे कळताच तेथून सर्व स्पर्धक आणि आदेश बांदेकर स्टुडिओच्या बाहेर पडले.त्यामुळे मोठा अनर्थ टाळला आहे.

Loading...

या अपघातातून महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर सुखरूप बचावले आहेत.या अगोदरही बांदेकर कार अपघात आणि जेवणातून झालेली विषबाधेतून थोडक्यात बचावले होते.स्टुडीओला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे.Loading…


Loading…

Loading...