‘मजुरांना केवळ कोरडे रेशन देऊन चालणार नाही, त्यांना भाजीपाल्यासाठी रोख रकमेची गरज’

raghunath rajan

मुंबई : मजुरांना केवळ मोफत कोरडे रेशन देऊन चालणार नाही. त्यांच्या इतर गरजांसाठी रोख रकमेची गरज आहे, असे म्हणत RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी काही सूचना केल्या आहेत. तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेले 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी पुरेसे नाही, असेही ते म्हणाले.

रघुराम राजन ‘द वायर’शी बोलताना म्हणाले की, तूट वाढण्याची चिंता करू नये. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी शक्‍य तितक्‍या उपाययोजना तत्काळ करण्याची गरज आहे.सध्याच्या परिस्थितीत खर्च करणे अपरिहार्य आहे. इतर देशही तसा खर्च करीत आहेत. परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर ही तूट कमी करता येऊ शकेल.

लघुउद्योगावर अगोदरच कर्जाचा मोठा बोजा आहे. त्यांना आणखी कर्ज दिल्यानंतर त्यांच्यावरील बोजात आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे हे उद्योग कार्यक्षमतेने उत्पादक होतील की नाही याबाबत शंका असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना महामारी हा एक राष्ट्रीय प्रश्‍न आहे, त्यामुळे प्रतिष्ठेचा प्रश्‍न न करता पंतप्रधान कार्यालयाने इतर विरोधी पक्षाशी विचारविनिमय करून मतैक्‍याने मार्ग काढण्याची गरज आहे. भारतात अर्थव्यवस्थेवर चिंतन करणारे अनेक तज्ज्ञ आहेत. त्याचबरोबर परदेशातही भारताचे हितचिंतक आहेत. त्यांनाही विचारात घेऊन हा प्रश्‍न हाताळण्याची गरज आहे, असे रघुराम राजन म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

अभिमानास्पद : कोरोनाचा पराभव करण्यासाठी प्राथमिक शिक्षक बनले कोरोना योद्धा !

आनंदाची बातमी : ससूनमध्ये पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी !