सुदैवानं, या सरकारचं आता एकच वर्ष उरलं आहे – राहुल गांधी

राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा: केंद्रिय अर्थसंकल्पावर राहुल गांधींनी ट्विटरवरून टीका केली आहे. ४ वर्षं उलटून गेली तरी सरकार हमीभावाचं आश्वासनच देते आहेत. फक्त दिखाऊ योजना, त्याच्या जोडीला निधी नाही. अशी टीका राहुल गांधींनी ट्विटरवरून केली आहे.

‘4 वर्षे उलटून गेली पण तरी हे सरकार शेतकऱ्यांना फक्त आश्वासन देतं आहे. ४ वर्षं उलटून गेली तरी हमीभावाचा अर्थसंकल्पात उल्लेख नाही. 4 वर्ष झाली तरी तरुणांना नोकऱ्या नाहीत. सुदैवानं, या सरकारचं आता एकच वर्ष उरलं आहे’. या आशयाचे ट्विट राहुल गांधी यांनी केल आहे.