…तरच देशाची अर्थव्यवस्था सुधारेल, नितीन गडकरींनी सांगितली पंचसूत्री

nitin-gadkari

फरिदाबाद : कोरोनाने देशात थैमान घातले आहे. देशात लॉकडाऊन घोषित करावे लागण्यामुळे अर्थव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अशात देशाला पुन्हा द्यायची असेल ‘पंचसूत्री’ची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. नव रचना शैक्षणिक संस्था येथे इंडिया वेबलॉगचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नितीन गडकरी बोलत होते.

देशाला विकासासाठी पंचसूत्रीची गरज असून, ती उपलब्ध झाल्यास अर्थव्यवस्था सुधारेल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. कामगार, जमीन, कायदा, रसद आणि तरलता या पाच मुख्य मुद्द्यांवर काम करण्याची गरज आहे. ही पंचसूत्री देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल. चीनची लॉजिस्टिक किंमत 8 टक्के, भारताची 13 टक्के आणि अमेरिकेची 12 टक्के आहे, ती कशी कमी करावी याचा विचार केला पाहिजे. अस नितीन गडकरी म्हणाले आहेत.

हिरो सायकलची ‘हिरोपंती’, चिन्यांना दिला जबर दणका

ज्यांच्याकडे भाकरी, कपडे आणि घरे नाहीत त्यांच्यासाठी सरकारने धोरण आखले पाहिजे. उद्योग, स्मार्ट शहरे आणि स्मार्ट व्हिलेज स्थापित करण्यासाठी सुमारे 115 जिल्ह्यांशी चर्चा केली आहे, असंही नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे. सरकारचं धोरण विकासवादी आहे. गरिबी हटवण्यासाठी आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यावे लागतील. जास्त उत्पादन करणे आणि अधिकाधिक लोकांना रोजगार देण्यावर मला नेहमीच विश्वास आहे. ते म्हणाले की, आजच्या काळात लोक खूप नकारात्मक झाले आहेत, त्यांना सकारात्मक, आनंदी, समृद्ध आणि सक्षम बनले पाहिजे, असंही गडकरींनी सांगितलं आहे.

गर्भवती, दुर्धर आजार असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा द्या