‘क्या हुआ तेरा वादा…’ धनगर समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांना ऐकवली गाणे

नागपूर : धनगर समाजाला आरक्षण देण्याचा ‘वादा’ करून भाजप सरकार सत्तेत आले. पण आता तीन वर्ष उलटून गेले तरी धनगर समाजाला आरक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे भाजपने केलेल्या या वाद्याची मुख्यमंत्र्यांना आठवण करून दिली तर नवल वाटायला नको.

त्याच झाल अस की, मुख्यमंत्र्यांनी नागपुरात धनगर समाजाच्या मेळाव्याला हजेरी लावली होती. जेव्हा मुख्यमंत्री मंचावर भाषणाला उभे राहिले आणि गाणे वाजले ‘क्या हुआ तेरा वादा…’

धनगर आरक्षणाच्या वायद्याची आठवण करुन देण्यासाठी धनगर समाजातल्या काही कार्यकर्त्यांनी चक्कं काही गाणी वाजवली. या गाण्यांच्या दरम्यान एक-एक ओळीचा तपशील सुद्धा होता. ज्यातून मुख्यमंत्र्यांनी सत्तेत आल्यानंतर वेगवेगळ्या काळात काय-काय शब्द दिला, याची त्यांना आठवण त्यांना करुन देण्यात आली.

दरम्यान, यानंतर आपण कोणताच वादा विसरलो नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल आहे.

You might also like
Comments
Loading...