fbpx

किंग्ज इलेव्हनने असं काम केलं आहे की,तुम्हाला देखील या संघाचा अभिमान वाटेल

kingsxi--flag

चंदीगड : पुलवामा हल्ल्यानंतर अनेक दानशूर तसेच देशभक्त नागरिकांनी या हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांना तसेच जखमींना मदत केली. आता इंडियन प्रीमियर लीग मधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली आहे.

फेब्रुवारी महिन्यात पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.शहीद सीआरपीएफ जयमल सिंग, सुखजिंदर सिंग, मनिंदर सिंग, कुलविंदर सिंग आणि तिलक राज यांच्या कुटुंबांच्या सदस्यांकडे त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात आली.

दरम्यान,शहिदांच्या कुटुंबियांना मदतीचा ओघ सुरूच असून यापूर्वी,बीसीसीआयने देखील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एका सामन्यातून आलेली रक्कम शहिदांच्या कुटुंबियांना दिली आहे.