fbpx

शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्यावर अंत्यसंस्कार, पंढरपूरकरांनी दिला वीरपुत्राला अखेरचा निरोप

शहीद मेजर कुणाल गोसावी

अमर रहे… अमर रहे, शहीद मेजर कुणाल गोस्वामी अमर रहे.. भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम अशा गगनभेदी घोषणांनी व साश्रुपूर्ण नयनांनी हजारोंच्या उपस्थितीत शहीद मेजर कुणाल मुन्नागीर गोस्वामी यांच्यावर वाखरी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथे लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी लष्कराच्यावतीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. जम्मू काश्मीरमधील नागरोटा येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मेजर कुणाल गोस्वामी शहीद झाले होते. शहीद मेजर कुणाल गोस्वामींची पाच वर्षीय मुलगी उमंगने मुखाग्नी दिला.