जिंकलस पोरा : दिवसा हॉटेलमध्ये काम अन् रात्री अभ्यास, बारावीत मिळवलं घवघवीत यश

kunal bendal

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. कोकणने आपली उज्वल निकालाची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा अव्वल स्थान कायम राखले आहे. कोकण विभागाचा राज्यात सर्वाधिक निकाल लागला आहे. कोकणचा निकाल ९५.८९ टक्के इतका लागला आहे. तर राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. यात मुलींनी बाजी मारली आहे.

या परीक्षेत ‘पूना नाईट स्कूल’मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यानं घवघवीत यश मिळवलं आहे. कुणाल सुरेश बेंडल असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्यानं हॉटेलमध्ये काम करून बारावीची परीक्षा दिली होती. कुणाल हा परीक्षेत 77 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. एवढंच नाही तर कुणाल याने शाळेत दुसरा क्रमांकही पटकावला आहे.

धनंजय मुंडेंचे बड्डे सेलिब्रेशन थेट बारामतीत, पवारांनी भरवला केक

कुणाल हा मूळचा कोकणातील आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील खिर्शीद या गावात कुणालचं छोटसं घर आहे. घरीची परिस्थिती हालकीची आहे. त्यामुळे कुणाल याचं दहावीपर्यंत शिक्षण गावीच झालं. दहावीनंतरचं शिक्षण घेण्यासाठी कुणाल पुण्यात आला. त्यानं आधी एका हॉटेलमध्ये काम मिळवलं. नंतर ‘पूना नाईट स्कूल’मध्ये अकरावीत प्रवेश घेतला. अकरावीतही कुणाल याला चांगले गुण मिळाले. पण बारावीच्या परीक्षेचं खूप टेंशन होतं, असं कुणालनं सांगितलं. दिवसा हॉटेलमध्ये काम करून कुणाल रात्र शाळेत शिक्षण घेतलं आणि परीक्षेत मोठं यश संपादन केलं आहे.

शासनाची बाजू अशीच भक्कमपणे मांडा, मराठा आरक्षणाच्याबाबतीत मुख्यमंत्र्यांसमवेत उपसमितीची बैठक