भाजपने आमचे १० आमदार फोडले तर आम्ही त्यांचे २० आमदार फोडू : कुमारस्वामी

टीम महाराष्ट्र देशा-  कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्ष्यांमध्ये रस्सीखेच सुरु असताना जेडीएस चे नेते कुमारस्वामी यांनी भाजपवर शरसंधान केलं आहे. भाजपने आमचे १० आमदार फोडले तर आम्ही त्यांचे २० आमदार फोडू असा थेट इशारा कुमारस्वामी यांनी भाजपला दिला आहे. भाजप सत्तेसाठी हपापलेली असून भाजप जेडीएस ला संपवायला निघाली होती त्यामुळे त्यांसोबत जाण्याचा प्रश्नच नाही असं कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. भाजपने धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फुट पाडल्याचा देखील आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे.

थोड्यावेळापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कुमारस्वामी यांनी भाजपवर निशाना साधला आहे. पाठींबा दिल्याबद्दल कॉंग्रेसचे आभार देखील कुमारस्वामी यांनी मानले. तर कुमारस्वामी यांचे भाऊ रेवण्णा यांनी भाजपने १०० कोटी रुपयांची ऑफर दिली तसेच केंद्रात मंत्रिमंडळात स्थान आणि राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याचं आमिष दाखवल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आज सकाळी भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बीएस येडीयुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. स्वतःची विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्याची माहिती त्यांनी राज्यपालांना दिली आहे. या बाबत लवकर निर्णय घेण्याची विनंती येडीयुरप्पा यांनी राज्यपालांना केली आहे मात्र राज्यपालांनी येडीयुरप्पा यांना अद्याप सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलेलं नाही .

दरम्यान,कॉंग्रेसचे चार तर जेडीएस चे दोन आमदार बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. कालच भाजपने काँग्रेसचे सात जेडीएसचे चार आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. कॉंग्रेसने जेडीएस ला दिलेला पाठींबा मान्य नसल्याचं सांगत कॉंग्रेसवर त्यांचाच पक्षातील नवनिर्वाचित लिंगायत आमदारांनी नाराजी दर्शविल्यामुळे कर्नाटक मध्ये कॉंग्रेसपुढील अडचणी वाढल्या आहेत.राजा व्यंकटप्पा नायक, वेंकट राव हे जेडीएस चे दोन आमदार बेपत्ता आहेत.

 

Shivjal