शेतकऱ्यांना १५ दिवसात कर्जमाफी; कुमारस्वामी यांची घोषणा

नवी दिल्ली : शेतऱ्यांना कर्जमाफी मिळून नाही देऊ शकलो तर आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन, राजकारणातून निवृत्त होऊ असं कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर म्हंटलं होतं. दरम्यान आता त्यांनी येत्या १५ दिवसात शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार असल्याची घोषणा केलीये.

राज्यातील शेतकऱ्यांना पंधरवडय़ात संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल, अशी ग्वाही कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी बुधवारी दिली. शेतकरी संघटना आणि प्रगत शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेत त्यांनी हे आश्वासन दिले.

धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना सत्तेवर येताच २४ तासांत संपूर्ण कर्जमाफीची ग्वाही देण्यात आली होती. ती पाळण्यात दिरंगाई होत असल्याबद्दल भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पाश्र्वभूमीवर कुमारस्वामींनी शेतकरी नेत्यांची तीन तास बैठक घेतली. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. या वेळी उपमुख्यमंत्री परमेश्वर आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते भाजपचे गोविंदा करजोळाही उपस्थित होते.