ठरलं तर… ! कर्नाटकात कुमारस्वामीच पाच वर्ष मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटकात एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वात काँग्रेस-जेडीएसने सरकार स्थापन केल्यानंतर मंत्र्यांच्या खाते वाटपावरून असलेल्या दोन्ही पक्षांमधील तक्रारी आता संपण्याच्या मार्गावर आहेत. दोन्हीही पक्षांचं खाते वाटपावर एकमत झालं आहे. शुक्रवारी याबद्दल औपचारीक घोषणा होऊ शकते. इतकंत नाही, तर काँग्रेस पक्ष कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाच वर्ष समर्थन देण्यासही तयार झालं आहे.

दरम्यान , कुमारस्वामी यांच्याचकडे पाच वर्ष मुख्यमंत्रिपद ठेवायचं की नाही, याबद्दल अजून निर्णय झाला नसल्याचं काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री परमेश्वर यांनी म्हटलं होतं. त्यामुळे काँग्रेसने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो आहे. तसंच मी काँग्रेसच्या दयेवर अवलंबून आहे, असं कुमारस्वामी यांनीही म्हटलं होतं.