fbpx

‘तोते ने उल्लू बना दिया’ 2G घोटाळ्यावर कुमार विश्वास यांची मार्मिक प्रतिक्रिया

टीम महाराष्ट्र देशा: घोटाळा झाला…घोटाळा झाला देशाच्या इतिहासातील सगळ्यात मोठा घोटाळा झाला अस म्हणत 2G घोटाळ्याची शिडी बनवत मोदी सरकार सत्तेच्या शिखरावर पोहचली. पण सी.बी.आय च्या विशेष न्यायलयाने या प्रकरणातील सगळ्या आरोपींना सक्षम पुराव्याअभावी निर्दोष सोडून दिल आहे. आता कॉंग्रेस म्हणत आहे की, असा घोटाळा कधी झालाच नाही. आज न्यायाधीशांने हा निर्णय सांगताना फक्त ३ ओळींत आपला निर्णय ऐकवला.

दरम्यान, आपचे नेते कुमार विश्वास यांनी या सगळ्या प्रकरणावर अतिशय मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हाला आठवत असेल २०१३ मध्ये कोळसा खाण घोटाळयाप्रकारणी सुनवाई करताना “सीबीआई पिंजरे में बंद तोता है.” अशी प्रतिक्रिया दिली होती. आता त्याचाच आधार घेत कुमार विश्वास यांनी ‘तोते ने उल्लू बना दिया’ अशी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाना साधला आहे.