‘उस पर क्या थूंकें, जो खुद थूक चाटने में में माहिर हो’

kejriwal vs -kumar-vishwas

टीम महाराष्ट्र देशा- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या लिखित राजीनाम्यानंतर आता पक्षाच्या अंतर्गत नाराजीचा सामना केजरीवाल यांना करावा लागत आहे. आपमध्ये अक्षरशः यादवी सुरु झाली असून ‘उस पर क्या थूंकें, जो खुद थूक चाटने में में माहिर हो’ असं ट्विट करत आम आदमी पक्षाकडून राज्यसभेवर न पाठवण्यात आल्याने नाराज असलेल्या कुमार विश्वास यांनी शेलक्या शब्दांत टीका केली आहे.

आपमधील यादवी

शिरोमणी अकाली दलाचे नेते विक्रमसिंग मजिठिया यांच्याविरोधात अमली पदार्थांच्या व्यवहारात हात असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी मागे घेतल्यानंतर शुक्रवारी भगवंत मान यांनी पंजाब आम आदमी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याशिवाय पक्षातील अन्य दोन खासदारांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. कंवर सिंह संधू आणि सुखपाल सिंह खैरा यांनी केजरीवालांवर टीका करताना त्यांनी लोकांना नाराज केलं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मागितलेल्या लिखीत माफीमुळे ते नाराज आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण
पंजाब विधानसभा निवडणुकीत अमली पदार्थाचा मुद्दा महत्वाचा ठरला होता. या निवडणुकीच्या प्रचारावेळी पंजाबचे महसूल मंत्री विक्रमसिंग मजिठिया यांचा अमली पदार्थाच्या व्यवहारात हात असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला होता. मे २०१६ मध्ये मजिठिया यांनी केजरीवाल आणि आपच्या अन्य दोघांविरोधात अब्रू नुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला होता. खोटे आरोप करुन केजरीवाल आपली व आपल्या कुटुंबाची बदनामी करत आहेत असा आरोप मजिठिया यांनी केला होता. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पंजाबचे महसूल मंत्री विक्रमसिंग मजिठिया यांची माफी मागितली. माफीनाम्यानंतर मजिठिया यांनीही खटला मागे घेतला आहे.

अरविंद केजरीवाल यांचा माफीनामा

अलीकडे मी तुमच्यावर तुम्ही ड्रग व्यवसायात सहभागी असल्याचे आरोप केले होते. माझी विधाने राजकीय हेतुने प्रेरित होती. या आरोपातून काहीही निष्पन्न झाले नसल्याचे माझ्या लक्षात आले आहे. या मुद्यांवरुन पुन्हा राजकारण नको असे केजरीवाल यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. मी तुमच्यावर केलेले सर्व आरोप मागे घेतो आणि माफी मागतो .