नक्षली चळवळीचं साहित्य बाळगलं हा गुन्हा असेल तर मला देखील अटक करा – कुमार केतकर

नवी दिल्ली : एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे याच्यासह, रोना विल्सन,शोमा सेन, महेश राऊत सुरेद्र गडलींग या पाच जणांना नक्षलवाद्यांशी सबंध असल्याच्या संशयातून बुधवारी अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या सर्व संशयितांचे माओवाद्यांशी कनेक्शन असून, सुरेंद्र गडलिंग आणि रोना विल्सन यांचे माओवाद्यांशी घनिष्ठ संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान या पाच जणांना अटक करण्यात आल्यानंतर कॉंग्रेस खासदार कुमार केतकरांनी सरकारवर निशाणा साधला आहे. हा सर्व प्रकार म्हणजे फॅसिजम आहे. जनतेचं महागाई आणि इतर मूलभूत प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी सरकारकडून करण्यात आलेली खेळी आहे.अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. तसेच नक्षली चळवळीचं साहित्य बाळगलं हा गुन्हा असेल तर मला देखील अटक करा. असं देखील त्यांनी म्हंटलं आहे.

You might also like
Comments
Loading...