डी.एस. कुलकर्णी यांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

dsk hemanti

पुणे- प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना गुंतवणूकदाराची फसवणूक प्रकरणी 23 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायालय विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी हा आदेश दिला आहे आज सकाळी  डीएसकेंना दिल्लीतून अटक करण्यात आली  होती. पुण्यातील कोर्टात हजर केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून डीएसकेंच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती.

गुंतवणूकदारांची 230 कोटींची फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटकेपासून दिलेले संरक्षण शुक्रवारी उच्च न्यायालयाने काढून घेतल्याने डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी चार पथके रवाना केली होती. अखेर आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास दिल्लीतून डीएसके यांना पोलिसांनी अटक केली आहे.