ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार कुलदीप नय्यर काळाच्या पडद्याआड

टीम महाराष्ट्र देशा : ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं आज सकाळी निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. आज दुपारी १ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. त्यांना २०१५ मध्ये रामनाथ गोयंका स्मृती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. २५ वर्ष नय्यर यांनी लंडनमध्ये टाइम्स समुहासाठी पत्रकारीता केली होती. त्यानंतर त्यांनी १९९० मध्ये ब्रिटनमध्ये उच्चायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली. तर ऑगस्ट १९९७ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली होती. नय्यर यांनी आतापर्यंत १५ पुस्तकं लिहीली असून, ‘बियॉण्ड द लाइन्स’, ‘इंडिया अफ्टर नेहरू’ आणि ‘इमरजन्सी रिटोल्ड’ या नावाजलेल्या पुस्तकांचा समावेश आहे.

गेल्या अनेक दशकांपासून ते पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय होते. त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात उर्दू पत्रकारितेतून केली होती. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी दिल्लीच्या ‘द स्टेट्समॅन’चे संपादक पद देखील भूषवले होते. केवळ पत्रकारिताच नाही तर सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील त्यांनी जनतेचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवले. आणीबाणीच्या काळात सरकारविरोधी लेखनासाठी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.

१९९० मध्ये त्यांना ग्रेट ब्रिटनमध्ये त्यांची उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नय्यर १९९६ मध्ये संयुक्त राष्ट्रासाठी हिंदुस्थानच्या प्रतिनिधीमंडळाचे सदस्य होते.

पंजाबमध्ये ईशनिंदा केल्यास होणार जन्मठेप