fbpx

कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी सोशल मिडियावर मोहीम

हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झालेल्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलीय यानंतर आता देशभरातून जाधव यांच्या सुटकेसाठी सरकारने प्रयत्न करावे अशी मागणी जोर धरू लागलीय .  पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे तीव्र पडसाद संसदेत देखील उमटलेत.  राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय राजकारण चांगलंच तापत असताना नेटीझन्सनीहि कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी सोशल मिडियावर मोहीम हाती घेतलीये .फेसबुक तसेच ट्विटरच्या माध्यमातून या युवकांनी कुलभूषण जाधव असा हॅशटॅग सुरु केलाय. . .तर नोटीझन्स कडून देखील या मोहिमेला उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय. . .