पाकड्यांच्या खोटारडेपणा उघड करत आहे महाराष्ट्राचा वाघ हरीश साळवे

टीम महाराष्ट्र देशा : आंतरराष्ट्रीय न्यायालयात आजपासून (सोमवार ) कुलभूषण जाधव प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. ही सुनावणी 21 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या प्रकरणी हिंदुस्थानकडून हरीश साळवे बाजू मांडत आहे. तर पाकिस्तानकडून अटर्नी जनरल अन्वर मंसूर खान यांच्या नेतृत्वाखालचे पथक बाजू मांडणार आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाल्यापासून हरीश साळवे पाकड्यांचा खोटारडेपणा जगासमोर मांडत आहेत. कोणत्याही देशाने आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन करणे योग्य नाही. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले आहे. दोन्ही देशांनी सहमतीने या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कूलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवत त्यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षी सुनावली आहे. या निर्णयाविरोधात भारताने आंतराराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. व्हिएन्ना करारातील अटीशर्तींचा उल्लेख करत साळवे पाकिस्तानला घेरत आहेत. या कराराचे उल्लंघन करत पाकिस्तान भारतातील निष्पाप नागरिकांचा बळी घेत असल्याचा आरोप साळवे यांनी केला आहे.

Loading...

पाकिस्तान जाधव यांच्यावर ठेवण्यात आलेल्या कोणत्याही आरोपांची माहिती देत नाही. त्यांच्यावर गंभीर आरोप असल्याचे सांगण्यात आले आहेत. ते कोणते आरोप आहेत, याची माहिती मिळाली पाहिजे. त्यांना कोणत्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली हे जगाला समजले पाहिजे, असे ते म्हणाले.

पाकिस्तानने सार्क कराराचेही उल्लंघन केले आहे. तसेच जाधव यांना वकीलही उपलब्ध करून देण्यात आला नाही. ही गंभीर बाब असल्याचे साळवे म्हणाले. तसेच लष्करी न्यायालयाचा आदेशही पाकिस्तानने हिंदुस्थानला दिलेला नाही. त्यामुळे ह गंभीर प्रकरण गुलदस्त्यात ठेवण्याचे कारण काय असा सवालही त्यांनी केला. कूलभूषण जाधव निर्दोष असून त्यांना अयोग्य पद्धतीने या प्रकरणात गुंतवण्यात आल्याचा आरोपही साळवे यांनी केला

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली