fbpx

कुकडी प्रकल्पातून पिण्याच्या पाण्यासाठी गावनिहाय नियोजन करून प्रस्ताव पाठविण्याचे जलसंधारणमंत्र्यांचे निर्देश

Ram-Shinde-

मुंबई : महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कुकडी प्रकल्पातून येत्या काळात कोणत्या गावाला पिण्यासाठी किती पाणी हवे, याचे नियोजन करून येत्या आठवडाभरात संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या मान्यतेने त्याचा प्रस्ताव कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मांडण्याचे निर्देश जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज येथे दिली.

विधानभवनात प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी, जलसंधारण, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार सर्वश्री बाबूराव पाचर्णे, नारायण पाटील, शरद सोनवणे, राहुल जगताप, सिंचन मंडळाचे सदस्य सचिव हेमंत धुमाळ उपस्थित होते.

येत्या काळात पिण्याच्या पाण्याची गरज पाहून सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याची माहिती घ्यावी. तसेच कुकडी प्रकल्पाच्या भागातील कोणत्या गावांना पाण्याची किती गरज, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी. त्याप्रमाणे नियोजन करून तसा प्रस्ताव कालवा सल्लागार समितीपुढे आणावा, असे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले.