‘त्या’ आठपदरी रस्त्यासाठी माझेच प्रयत्न

खा. शिवाजीराव आढळराव पाटील आणि आ.बाबूराव पाचर्णेमध्ये श्रेयवाद

टिम महाराष्ट्र देशा : पुणे -अहमदनगर- औरंगाबाद असा 235 कीमीचा रस्ता आठपदरी करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. हा रस्ता ऑक्टोबर 2017 मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला असून 553 (एफ) असा क्रमांक देण्यात आला आहे.

bagdure

या रस्त्यासंदर्भात खा.शिवाजीराव आढळराव पाटील म्हणतात की , पूणे शिरूर नगर हा राज्यसरकारच्या ताब्यात होता. मात्र आठ महिन्यापूर्वी हा रस्ता राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्यात आला. त्याची प्रक्रीया अंतिम टप्प्यात आहे. पूणे- शिरूर – नगर हा रस्ता वाघोली सह लोणीकंद ,कोरेगाव भीमा, शिक्रापूर, शिरूर आदी गावांतून जाणारा अतिशय महत्वाचा रस्ता आहे. कोरेगाव भीमा , रांजणगाव, MIDC आणि निवासी क्षेत्र तसेच मराठवाडा ,विदर्भाकडे जाण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता असल्याने वाहनांची मोठी गर्दी वाढलेली आहे. या रस्त्याचे रुंदीकरण व्हावे यासाठी काही वर्षांपासून माझे प्रयत्न सुरु आहेत.

तर शिरूर -हवेली चे आमदार बाबूराव पाचर्णे म्हणतात की, हा रस्ता राज्यसरकारच्या ताब्यात होता. तेव्हा मी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो . सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या मदतीने पूणे ते शिरूर 70 कीमी च्या विकासासाठी 1200 कोटी रूपयांचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला होता. विधिमंडळाच्या अधिवेशनात या DPR ला मंजूरी देखील मिळाली होती. मात्र हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत झाल्याने पूढील काम ते करणार आहेत. आम्ही तयार केलेला डी.पी.आर त्यांना देणार असून रस्त्याचे रुंदीकरण तातडीने करण्यात यावे यासाठी पाठपूरावा करणार आहे. सदर आठपदरी रस्त्याने पूणे ते औरंगाबाद हे अंतर केवळ तीन तासांचे होणार आहे.

You might also like
Comments
Loading...