fbpx

क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडल्याने आमचं मोठं नुकसान : अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा :  बीड जिल्ह्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ मानले जाणारे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला रामराम केला आहे, क्षीरसागर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्वाचे नेते असणारे जयदत्त क्षीरसागर हे मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज होते.

जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडल्यावर माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंगेसचे नेते अजित पवार यांनी ‘जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांच्या कौटुंबिक वादामुळे राष्ट्रवादी सोडली. विधानसभा डोळ्या समोर ठेवून ते गेले आहेत. मात्र त्यांनी राष्ट्रवादी सोडल्याने पक्षाचं मोठं नुकसान झालं आहे’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ‘जयदत्त क्षीरसागर यांच्या घरात वाद होता. त्यांच्याऐवजी पुतणे संदीप क्षीरसागर यांना तिकीट मिळेल असं त्यांना वाटलं असावं. आता जागा वाटपात ती जागा शिवसेनेला जाईल म्हणून ते सेनेत गेले. कदाचित त्यांना मंत्रीपदही मिळेल, असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, जयदत्त क्षीरसागर यांच्या जाण्याने बीड मध्ये झालेले नुकसान अधिक काम करुन भरून काढू, असं विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.