मला झेड प्लस सिक्युरीटी द्या- के आर के

श्रेयश तळपदे v/s के आर के वादाला नवीन वळण

वेबटीम-वास्तविक स्वयंघोषित कमाल राशिद खान ऊर्फ केआरके हा सर्वच चित्रपटांवर टीका करीत असतो. ट्विटच्या माध्यमातून त्याचा नेहमीच टिवटिवाट असतो. यावेळेसही त्याने असेच काहीसे केले. ट्विट करताना त्याने लिहिले की, ‘टॉप क्लास फालतू चित्रपट असलेल्या ‘पोस्टर बॉयज’ने पहिल्या दिवशी एक कोटी ८० लाख रुपयांची कमाई करून सनी देओलचे शून्य स्टारडम असल्याचे दाखवून दिले. तसेच श्रेयश तळपदे किती खराब दिग्दर्शक आहे हेदेखील सिद्ध केले.’ जेव्हा हे ट्विट श्रेयसने वाचले तेव्हा त्याने केआरकेला चांगलेच खडेबोल सुनावले.

केआरकेचा वाद नुकताच अभिनेता श्रेयस तळपदेसोबत झाला असून या वादानंतर केआरकेने भारत सरकारकडे झेड प्लस सिक्युरिटीची मागणी केली आहे.
अभिनयानंतर श्रेयश  आता दिग्दर्शन क्षेत्राकडे वळला आहे. पोस्टर बॉइज हा त्याने दिग्दर्शित केलेला चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटात सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी एक करोड ७५ लाखाची कमाई केली.

या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईविषयी चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्वीट केले होते. तरण आदर्श यांच्या ट्वीटनंतर केआरकेने या चित्रपटाची आणि चित्रपटातील कलाकारांची टर उडवायला सुरुवात केली.

कोणत्याही चित्रपटाची अथवा कलाकारांची टर उडवणे हे केआरकेसाठी नवीन नाहीये. पण अनेकवेळा हे कलाकार केआरकेकडे दुर्लक्ष करणेच पसंत करतात. पण श्रेयसने तसे काहीही न करता केआरकेला सडेतोड उत्तर दिले. श्रेयसने केआरकेला त्याच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिले. त्याने केआरकेला त्याच्या मर्यादेत राहायला सांगितले. तसेच त्याने मर्यादा ओलांडली तर तो मारच खाईल असे देखील श्रेयसने ट्वीटमध्ये लिहिले. श्रेयसचे हे ट्वीट वाचून केआरके लगेचच म्हणाला की, मला भारत सरकारकडून झेड प्लस सिक्युरीटी हवी आहे.

You might also like
Comments
Loading...