‘केआरके’ खरंच देश सोडून जाणार का? नेटकाऱ्यांचा सवाल…
मुंबई : बॉलीवूड अभिनेता कमाल आर खान हा सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. बऱ्याचवेळा त्याने बॉलिवूड कलाकारांवर टिका करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या होत्या. बऱ्याच वेळा केआरकेने यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या होत्या. मुख्यमंत्री योगी ही निवडणूक जिंकणार नाहीत, असा दावा केला आणि असे झाल्यास तो भारतातून कायमचा निघून जाईल म्हणाला होता.
एवढचं काय तर पराभूत झाल्यास योगी यांना त्याने नेपाळला जाण्याचा सल्लाही दिला होता. यासोबत जसा जसा निकालचा दिवस जवळ येत होता. तसा केआरके योगी यांच्याविषयी सतत ट्वीट करत होतं . तर निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी, केआरकेने योगी यांच्याबद्दल ट्वीट केले होते की, “फक्त एक दिवस बाकी आहे, योगीजींचे जाण्यासाठी. बाय बाय योगी जी.” आता निवडणुकाचा निकाल लागल्यानंतर त्याच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव सुरू केला आहे .
केआरकेला ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, “केआरके सर जी. यावेळी तुम्ही चुकीचे आहात. योगीजी किमान २४७ जागांवर विजयी होत आहेत. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.” दुसरा नेटकरी केआरकेचं एक जुन ट्वीट शेअर करत त्याला भारत सोडण्याची आठवण करून दिली आहे. “खान साहेबांना आपल्या वचनाचे पालण करण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे,” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी केआरकेला ट्रोल केले आहे.
महत्वाच्या बातम्या :