‘चला हवा…’ शो मधून कृष्णा घोंगेने घेतला निरोप…

‘चला हवा…’ शो मधून कृष्णा घोंगेने घेतला निरोप…

krishna

मुंबई : टेलिव्हिजनवरील विनादी मालिका ‘चला हवा येऊ द्या’ ने सर्वांनाच भरपूर हसायला लावत असते. मात्र या कार्यक्रमातील एका विनोदवीराने नुकतंच या कार्यक्रमाचा निरोप घेतला आहे. ‘गुंठामंत्री’ अशी ओळख असलेला कृष्णा घोंगे हा गेल्या काही दिवसांपासून सेटवर किंवा एकाही भागात दिसत नाही. त्यामुळे कृष्णाने हा शो सोडल्याची चर्चा सिनेसृष्टीत रंगली होती.

नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट करत यामागचे कारण कृष्णाने सांगीतले आहे. अभिनेता प्रतीक गांधीसोबत एक फोटो शेअर केला असून ‘रिस्क है तो इश्क है’ असे अनोखे कॅप्शन त्याने या फोटोंना दिले आहे. त्यामुळे आता कृष्णा हा झी च्या हिंदी मालिकेत झळकणार असल्याचे बोललं जात आहे. कृष्णा हा हिंदी ‘झी कॉमेडी शो’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान कृष्णा आता हिंदी मालिकेत काम करणार असल्याने यापुढे तो ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर दिसणार नाही.

कृष्णा हा नोकरी करत असताना आवड म्हणून फिल्ममेकिंगचे धडे गिरवायला सुरुवात केली. पण गावातील रांगड्या भाषेमुळे त्याला अनेक ठिकाणी नकार मिळाला. मग त्याने स्वत:च शॉर्टफिल्म बनवायला सुरवात केली. यादरम्यान त्याला अनेक पारितोषिकही मिळाली. त्यानंतर एकेदिवशी निलेश साबळेशी त्याची ओळख झाली. पुढे निलेशचा असिस्टंट म्हणून त्याला काम मिळाले. त्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात छोट्या मोठ्या भूमिका साकारून कृष्णाने एक वेगळी ओळख निर्माण केली.

महत्त्वाच्या बातम्या