कृष्णा अँड हिज लीला चित्रपटावर तातडीने बंदी घालण्याची कृष्ण भक्तांची मागणी

Krishna and His Leela movie

पुणे – नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘कृष्णा अँड हिज लीला’ या चित्रपटावर तातडीने बंदी घालण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

या चित्रपटात हिंदू देवदेवतांचा अवमान करण्यात आला आहे. भगवान श्रीकृष्ण, माँ राधा या आमच्या भावनांशी निगडित आहे. चुकीच्या पद्धतीने या चित्रपटात संवाद होत आहे. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. कोट्यवधी श्रीकृष्ण भक्त नाराज आहेत. असेही बाबा धुमाळ यांनी सांगितले.

भगवान श्रीकृष्ण आणि माँ राधा यांच्यावर आमची श्रद्धा आहे. या चित्रपटात दोघांच्या व्यक्तिरेखांची विटंबना करण्यात आली आहे. त्यामुळे कोट्यवधी श्रीकृष्णा भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. दिनांक 25 जून रोजी नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. हा तेलगू चित्रपट असून, भगवान श्रीकृष्ण आणि माँ राधा यांची या चित्रपटात विटंबना करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आमच्या सारख्या कोट्यवधी भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या चित्रपटावर तातडीने शासनाने बंदी घालावी. आणि संबधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी धुमाळ यांनी केली आहे. या चित्रपटावर तातडीने बंदी घातली नाही तर, आम्ही श्रीकृष्ण भक्त मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

इंदुरीकर महाराजांना ‘ते’ वक्तव्य भोवलं, अखेर गुन्हा दाखल

रामदेव बाबांच्या कोरोनावरील औषधाला मोदी सरकारचा झटका, घेतला हा निर्णय

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर करणार चित्रपट सृष्टीत पदार्पण

IMP