पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला बनल्या सिनेट

टीम महाराष्ट्र देशा: कट्टर मुस्लीम राजकारण असणाऱ्या पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच एक हिंदू महिला सिनेट बनल्या आहेत. ‘डॉन’ दैनिकाने दिलेल्या माहिती नुसार कृष्णाकुमारी कोहली (वय 39) या सिंध प्रांतातून महिलांसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत कोहली या बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या सदस्य आहेत

कृष्णकुमारी कोहली या सिंध प्रांतातील थार जिल्ह्यातील नगरपारकर गावच्या रहिवाशी आहेत. कोहली यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला.कोहली आणि त्यांच्या कुटुंबाला येथील एका सावकारांने तीन वर्षे बंदी म्हणून ठेवले होते. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह लालचंद यांच्याशी झाला. लग्न झाल्यानंतर त्यांनी समाजशास्त्रात पदवित्तूर पदवी प्राप्त केली. कोहली यांचा भाऊ देखील पाकिस्तान पिपल्स पार्टीचा सदस्य आहे. त्या पाकिस्तानातील स्थलांतरीत नागरिकांसाठी काम करतात.

You might also like
Comments
Loading...