महान क्रांतिकारक राजगुरु हे संघाचे स्वयंसेवक; संघाचा खळबळजनक दावा

krantivir rajguru

मुंबई: महान क्रांतिकारक राजगुरु हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते, असा खळबळजनक दावा संघाचे माजी प्रचारक आणि पत्रकार नरेंद्र सेहगल यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. सँडर्सच्या हत्येनंतर शहीद राजगुरु हे नागपुरातील संघ मुख्यालयात येऊन गेले होते, असंही त्यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.

Loading...

सेहगल यांनी भारतवर्ष की सर्वांग स्वतंत्रता या पुस्तकात संघ देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होता हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इंग्रजांविरोधात लढताना आपल्या प्राणाची आहुती देणारे शहीद राजगुरु हे नागपूर येथील मोहिते वाड्याच्या शाखेचे स्वयंसेवक असल्याचा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकाचे वाटप आता संघाच्या स्वयंसेवकांमध्ये केले जात आहे.

नेमकं काय म्हणाले सेहगल पुस्तकात ?

१. राजगुरु हे नागपूरच्या मोहिते वाड्याच्या शाखेचे स्वयंसेवक होते.
२. राजगुरु हे संघ संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचे निकटवर्तीय होते.
३. डॉक्टर हेडगेवारांनी त्यांची राहण्या-खाण्याची सोय भैय्याजी दनः यांच्या घरात केली.
४. नागपुरात येऊन राजगुरु डॉक्टर हेडगेवारांना भेटले.
५. इंग्रज पोलीस अधिकारी सँडर्सला गोळ्या घातल्यावर ते लाहोर सोडून पळाले.Loading…


Loading…

Loading...