क्रांतीचौक पोलिसांनी केला नवखा वाहनचोर अटक; सात दुचाकी जप्त

औरंगाबाद : शहरात वाहनचोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला असतना क्रांतीचौक पोलिसांनी नवख्या वाहनचोराला अटक केली. त्याच्याकडून ७ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून चोरी मधला मुख्य सूत्रधार रईस बोक्या दुसऱ्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. त्याच्या सांगण्यावरून शेख अतिफ शेख लतीफ वय २० रा. आलमगीर कॉलनी, साजापूर) असे वाहनचोराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असतांना दि. १८ रोजी विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संतोष राऊत आणि पथक एस टी वर्कशॉप जवळून जात असतांना. त्यांना अतीफ संशयित हालचाली करतांना दिसला. त्यांनी सुरुवातीला त्याच्याकडे विचारपूस केली, तो उडवा उडवीची उत्तर देत असल्याचे समजताच त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवताच दुचाकीची चोरी रईस बोक्याच्या सांगण्यावरून केल्याचे अतीफने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी अतीफकडून १ पल्सर, २ शाईन, ४ एच एफ डिलक्स, ४ दुचाकी जप्त केल्या. त्यामुळे क्रांती चौक ४,छावणी २ आणि बेगमपुरा पोलीस ठाण्यातून १ अशा सात गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे. त्या दुचाकी लासुर ला 3, तर एक श्रीरामपूरला पंक्चर झाल्याने फेकून दिली असल्याची माहिती देण्यात आली. गुजरात मध्ये ही काही दुचाकी विक्री केल्याचा संशय पोलिसांना आहे.

सात महिन्यात केल्या २२ दुचाकी जप्त

या सात दुचाकींसह क्रांतीचौक पोलिसांनी सात महिन्यात २२ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहे. त्यात जानेवारीत १, फेब्रुवारी ३, मार्च मध्ये सर्वात जास्त १०, जूनमध्ये १ अशा २२ दुचाकी जप्त केल्या. हि कारवाई पोलीस निरीक्षक गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष राउत, स. फौ नसीम पठाण, पो ना. मनोज चव्हाण, अजीज खान, सूर्यवंशी, अमोल मनोरे, देविदास खेडकर यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

IMP