औरंगाबाद : काही महिन्यापासून घट झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात तालुकानिहाय उभारलेल्या कोविड केअर सेंटरला पुन्हा सुरु करणार आहेत. यासाठी कॉमन हेल्थ सर्व्हिस भरती प्रक्रिया अंतर्गत जिल्हा परिषदेत मंगळवारी संबंधित कर्मचाऱ्यांची मुलाखती घेतल्या. दरम्यान २६ जणांची भरती केली आहे.
काही दिवसांपासून शहरी भागासोबतच ग्रामीण भागातदेखील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दरम्यान, चाळीस वर रुग्ण संख्या आठवड्याभरात १०६ वर पोहचली. यात औरंगाबाद, वैजापूर, गंगापूर, कन्नड या चार तालुक्यात सध्या रूग्णसंख्या अधिक प्रमाणात वाढत आहेत. यासाठी आता ग्रामीण भागात कॉनटॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग आणि बाधित रुग्णांवर उपचार देण्यावर भर देणार आहे.
यासाठी लागणाऱ्या सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. फक्त त्या पुन्हा सुरु करणार आहेत. कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येईपर्यंत संबंधिताला घरातच विलगीकरणात राहणे बंधनकारक केल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले यांनी सांगितले.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहेत. परंतु ग्रामीण भागातील रुग्णसंख्या पाहता तुर्तास ग्रामीण भागातील शाळा बंद करण्याचा विचार नाही. जोपर्यंत शासनाचे आदेश येतनाही तोपर्यंत ग्रामीण भागातील शाळा चालु राहतील असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोंदवले यांनी स्पष्ट केले होते. जिल्ह्यातील बंद केलेल्या कोव्हीड केअर सेंटर्स पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
कर्मचाऱ्यांच्या मुलाखती
यशवंतराव चव्हाण सभागृहात कर्मचारी भरती प्रक्रिया पार पडली. त्यानुसार मंगळवारी या मुलाखती घेतल्या. जिल्ह्यातील तालुक्यात २१ हुन अधिक कोविड केअर सेंटर आहेत. २ हजाराहून अधिक रुग्णांना उपचार देण्याची सोय आहे. शाळा इमारती सोडून इतर सेंटर चालू करण्याचे नियोजन जि.प. विभागाचे चालू आहे. कॉमन हेल्थ सर्व्हिस भरती प्रक्रिया अंतर्गत संबंधित कर्मचाऱ्यांची मुलाखती मंगळवारी घेतला. यात २६ जणांची भरती केली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी दिली आहे.
सोशल डिस्टंसिंगचा अभाव
मंगळवारी झालेल्या मुलाखतीसाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उमेदवार आले होते. यशवंतराव चव्हाण सभागृहाबाहेर उमेदवार उभे होते. यावेळी सोशल डिस्टंसिंगचा मात्र फज्जा उडाला. कोरोना उपाययोजनेसाठी आलेले हे उमेदवार स्वतः कोरोना संसर्गासाठी कारणीभूत ठरू शकतील अशी चर्चा दिवसभर जि.प परिसरात होती.
महत्वाच्या बातम्या :
- सत्तेचा गैरवापर करून प्रारुप मतदार याद्यांमधे मोठ्या प्रमाणावर हेराफेरी होतेय ?
- संजय राठोड यांनी जी भूमिका मांडली तीच भूमिका आम्हीही सांगतोय – नाना पटोले
- यापुढे भाजपाला कधीच “अच्छे दिन” येणार नाहीत यावर शिक्कामोर्तब झाला आहे – राष्ट्रवादी
- संजय राठोड यांनी जी भूमिका मांडली तीच भूमिका आम्हीही सांगतोय – नाना पटोले
- अनेक दिवसानंतर मिनी घाटीत कोरोना रुग्ण