‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाउन वाढवण्याचे संकेत

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरुच असून आज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 लाख 4 हजारापेक्षा जास्त आहे. तर कोरोनामुळे बळींची संख्या 95 हजार 506 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे तीन लाख 57 हजार रुग्ण बरे झाले आहेत,जवळपास 11लाख 51 हजार लोक कोरोनाबाधित आहेत. त्यातील चार टक्के म्हणजे 49 हजार 151 रुग्ण गंभीर आहेत.

भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 5865 वर पोहोचला आहे तर कोरोनोमुळे देशात 169 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 477 लोक कोरोनामुक्त देखील झाले आहेत. भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक 1135 कोरोनाबाधित आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी लॉकडाउन कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आज होणाऱ्या बैठकीत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यासंबंधी निर्णय होईल असे त्यांनी सांगितले.

पंजाबमध्ये आज १३२ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आम्ही २८७७ नमुन्यांची तपासणी केली आहे. पंजाबची लोकसंख्या अडीचकोटी पेक्षा जास्त आहे. त्यातुलनेत चाचणीचे प्रमाण कमी आहे असे अमरिंदर सिंग म्हणाले.