Koregoan-Bima violence : पालकमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दंगलपीडितांचे आंदोलन

पुणे : कोरेगाव- भिमा हल्ल्याला पाच महिने लोटले मात्र पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीश बापट यांनी सदर घटनेकडे पुर्णता दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करत दंगल पीडितांनी आज बापट यांच्या कसब्यातील कार्यालयासमोर आंदोलन केलं. दंगलपीडितांचे पुनर्वसन करावे तसेच बापट यांनी राजीनामा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

अत्याचार ग्रस्तांची भेट न घेणे, पुनर्वसन व आरोपींवर अटकेची कारवाई करणेचे आदेश द्यावेत यासह इतर अनेक बाबींसंदर्भात आढावा बैठक न घेणे या बाबी गंभीर आहेत.पालकमंत्री पदावरुन बापट साहेबांनी पायउतार होवुन अन्य कार्यक्षम मंत्र्याची जिल्हा पालकमंत्री पदावर नियुक्ती होवुन अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित मागण्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

You might also like
Comments
Loading...