fbpx

वढु बुद्रुकला केंद्रीय अनूसुचित जाती आयोगाच्या सदस्यांची भेट

पुणे  : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) परिसरात 1 जानेवारी रोजी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्या डॉ. स्वराज विद्वान यांनी वढु बुद्रूक येथील समाधीस्थळ तसेच पेरणेफाटा येथील विजय रणस्तंभास भेट दिली. यावेळी पाहणी करुन नागरिकांना सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहन त्यांनी केले.

केंद्रीय अनुसुचित जाती आयोगाच्या सदस्या डॉ. स्वराज विद्वान यांनी वढु बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज आणि गोविंद गोपाळ यांचे समाधीस्थळ आणि पेरणेफाटा येथील विजयस्तंभास भेट दिली. यावेळी डॉ. स्वराज विद्वान यांच्यासोबत पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे, जिल्हा पोलीस अधिक्षक सुवेज हक, उपअधिक्षक डॉ. संदीप पखाले, आदी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. स्वराज विद्वान यांनी वढु बुद्रुक आणि पेरणे फाटा येथील उपस्थित अधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थांशीही चर्चा केली. यावेळी समाधीस्थळांची आणि घडामोडींची माहिती घेवून ग्रामपंचायतीकडे असलेले ऐतिहासिक दस्तऐवजांची त्यांनी पाहणी केली. तसेच सर्व ग्रामस्थांना शांतता आणि सलोखा जपण्याचे आवाहनही केले.