कोरेगाव-भीमा हिंसाचारातील मृत राहुल फटांगडेच्या कुटुंबाला मदत

पुणे: सणसवाडी याठिकाणी मृत झालेल्या राहुल फटांगडे याला शासनाकडुन जाहीर झालेल्या १० लाखाची मदतीचा धनादेश देण्यात आला आहे. १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीमध्ये बऱ्याच ठिकाणी पडसाद उमटले.तर कोरेगाव भीमा गावच्या शेजारी असलेले सणसवाडीतही या घटना घडताच काही वेळातच त्याठिकाणी सुद्धा दंगलीचे वातावरण निर्माण झाले.याच दरम्यान राहुल हा काही कामानिमित्त सणसवाडीच्या चौकामध्ये गेला असता त्याचा या दंगलीत दुर्दैवी मृत्यू झाला होता. राहुल हा घरातील कर्ता पुरुष होता.या घटनेनंतर शासनाने राहुलच्या कुटुंबियांना १० लाखाची घोषणा केली होती.परंतु सरकारने ९ व्या दिवशी याची पूर्तता करून राहुलच्या घरच्यांना आधार दिला आहे.

यावेळी शिरूरचे उपविभागीय अधिकारी भाऊ गलांडे,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले,उपविभागीय पोलीस अधिकारी पठारे,शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले आदी उपस्थित होते.