भिडे गुरुजी रडले, माझा काही संबंध नाही म्हणाले : उदयनराजे

भिडे गुरुजींची पाठराखण करत शरद पवार यांना घरचा आहेर दिला

टीम महाराष्ट्र देशा  : शिवप्रतिष्ठान चे  संभाजी भिडे गुरुजी  यांचे उदयनराजे भोसले यांच्या सोबत फोनवर बोलणे झाले असता.  वढू गावात ‘आम्ही आपल संभाजी महाराज्यांची समाधीची साफ सफाई साठी चाललो होतो’. आणि अचानक असा प्रकार झाला. या सर्व प्रकारात माझा काहीही संबंध नाही. माझ्यावर निराधार आरोप होत आहेत. असे बोलून गुरुजींना रडू कोसळले.

उदयनराजे म्हणाले की, “भिडे गुरुजी आज मॅथेमॅटिक्समध्ये पीएचडी केलेला, एक नंबर माणूस आहे. हे जर आम्हाला प्रोफेसर असते, त्यांनी आम्हाला प्रश्न-उत्तर दिले असते तर मी कधी आयुष्यात पासही झालो नसतो. ग्रेट माणूस आहे. त्याच्यावर अॅट्रॉसिटी लावता, थोडा तरी विचार करायला हवा.”

bagdure

कोरेगाव भीमा घटनेला हिंदुत्त्ववादी संघटना असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे, याबाबत विचारलं असता, उदयन राजे म्हणाले की, “जितेंद्र माझा मित्र आहे. आमदार आहे. हॅण्डसम आहे. पण त्याने थोडा विचार करायला हवा होता, काय बोलतो, कोणाशी बोलतो आणि कशासाठी बोलतो. इफ अँड बट ऑलवेज देअर.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर 

You might also like
Comments
Loading...