शहरी माओवाद्यांना अटक; ‘त्या’ पत्रात नेमके आहे तरी काय?

टीम महाराष्ट्र देशा- एल्गार परिषदेतील आयोजनामध्ये नक्षलवाद्यांचा सहभाग आणि आर्थिक मदत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता पुणे पोलिसांनी माओवाद्यांच्या थिंक टँकवरच हल्ला केला. मंगळवारी देशभरात एकाच वेळी मुंबई, ठाणे, हैदराबाद, रांची, फरिदाबाद, दिल्लीत छापेमारी करून टॉपच्या पाच संशयित शहरी माओवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

तेलगू कवी वरवरा राव, अरुर परेरा, गौतम नवलखा, वर्णन गोन्सालवीस, सुधा भारद्वाज यांची नावे समोर आल्याने ही कारवाई केली. पोलिसांनी जप्त केलेल्या एका पत्रामध्ये तर नवलखाचा कश्मीरमधील फुटीरवाद्यांशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या प्रकरणी पुणे पोलिसांनी यापूर्वी परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे,  सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रॉनी विल्सन आणि प्रा. शोमा सेन यांना अटक केली होती. त्यांच्याकडे सापडलेल्या 200 ई-मेलमध्ये या पाच जणांचा बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याचे दिसून आले.

पत्रात नेमके आहे तरी काय?
जून 2018 मध्ये माओवाद्यांशीसंबंधीत असलेले एक पत्र समोर आले होते. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची राजीव गांधी यांच्याप्रमाणे हत्या करण्याच्या कटाची माहिती उघड झाली होती. 18 एप्रिलला कॉम्रेड प्रकाश यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले गेले आहे की, ”हिंदू फॅसिझमला हरवणं आता आवश्यक झाले आहे. मोदींच्या नेतृत्वात हिंदू फॅसिस्ट पुढे जात आहेत, त्यांना वेळीच थांबवणं गरजेचं आहे. मोदींच्या नेतृत्वात भाजपाची 15 राज्यांमध्ये सत्ता आहे. हे अशाच पद्धतीनं सुरू राहिले तर धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे राजीव गांधी हत्याकांडप्रमाणे घटना घडवावी, असा विचार सुरू आहे. जर असे झाल्यास, हा एक सुसाईड अटॅक वाटू शकतो. आपल्याकडे ही एक संधी आहे, असे आम्हाला वाटते. मोदींच्या रोड शोला टार्गेट करणं एक चांगले नियोजन होऊ शकते”.

You might also like
Comments
Loading...