कोरेगाव-भीमा दंगलीच्या साक्षीदार तरुणीचा मृतदेह सापडला, आत्महत्या की खून तपास सुरु

Request to District Collector to inquire about Bhima Koregaon riots

पुणे :कोरेगाव भीमा हिंसाचाराची साक्षीदार पूजा सकट या मुलीचा मृतदेह रविवारी विहिरीत आढळल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. १ जानेवारीला येथे दंगल झाली होती. दंगलीच्या वेळी घर पेटवण्याच्या प्रकाराचा संदर्भ या घटनेशी लावण्यात येत आहे.माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा खून करून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आला, असा दावा मुलीच्या वडिलांनी केला आहे. माझे घर ज्यांनी पेटवून दिले त्यांचा या हत्येत सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.दोन दिवसआधी पूजाच्या कुटुंबीयांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 1 जानेवारीला हिंसाचार झाला होता. जाळपोळ आणि दगडफेकही झाली होती. या हिंसाचारात पूजा सकटचं घर जाळण्यात आलं होतं. हिंसाचाराच्या त्या घटनेची पूजा साक्षीदार होती.घर जाळल्यानंतर पूजाचं कुटुंब कोरेगाव-भीमापासून जवळच असलेल्या वाडा नावाच्या गावात राहायला गेलं. मात्र वाडा गावात ज्या ठिकाणी हे कुटुंब राहत होतं, तिथल्या जमीन मालकाने काही दिवसांमध्येच घर सोडण्यासाठी तिच्या कुटुंबाच्या मागे तगादा लावला.पूजा शनिवारी घरातून नाहीशी झाली. रविवारी तिचा मृतदेह वाडा गावातील एका विहिरीत आढळून आला.

Loading...

पूजाचे वडील सुरेश सकट याचं काय म्हणणे आहे ?
माझे कुटुंब १५ वर्षांपासून भीमा कोरेगावमधील पीडब्ल्यूडीच्या जागेत राहत आहे. माझ्या घराशेजारचा प्लॉट एकाला विकत घ्यायचा आहे. मात्र माझ्या पत्र्याच्या शेडमुळे त्या जागेची किंमत कमी होत असल्याने घर खाली करण्याबाबत काही दिवसांपासून मला धमकी देण्यात येत आहे. त्याबाबत मी १८ नोव्हेंबर २०१७ रोजी कोल्हापूर पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार देखील केली होती.
१ जानेवारीला येथे दंगल झाली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी माझे घर जाळण्यात आले. त्यामागे घर खाली करण्याची धमकी देणाºयांचा हात होता. मी आतापर्यंत चार वेळा तक्रार दिली आहे. नुकताच पुरवणी जबाब देखील दिला होता. त्यातूनच त्यांनी माझ्या मुलीचा खून केला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू